स्टोरी

कै.वाळके मास्तर जयंती निमित्त स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून उद्या शहरात विविध उपक्रम.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कै. वाळके मास्तर जयंती निमित्त उद्या दिनांक ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहरांमध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. सर्वप्रथम ठीक सकाळी ठीक ८ वाजता वाळके मास्तर व्यायाम शाळेमध्ये स्वराज्य संघटना व आजी माजी विद्यार्थ्यांकडून वाळके मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करण्यात येणार आहे. त्यानंतर कित्येक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे स्विमिंग पूल बंद होते ते स्वराज्य संघटनेच्या पुढाकाराने उद्या सुरू होणार आहे व त्याचा शुभारंभ सकाळी ८:३० मिनिटांनी होणार आहे. त्यानंतर ठीक सकाळी ९ वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वराज्य संघटनेमार्फत ६० खुर्च्या भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहेत. सदर खुर्च्यांचा लाभ पेशंट व स्टाफ साठी व्हावा हा उद्देश आहे. तसेच अपघात विभागाला पाण्याची एक्वागार्ड मशीनही देण्यात येणार आहे.

अशा या सेवाभावी उपक्रम कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सावंतवाडी शहराचे प्राख्यात जेष्ठ वकील बापू गव्हाणकर, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, उद्योजक राजन आंगणे, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, उद्योजक राजू भालेकर, मंगेश उर्फ राजू नाईक वगैरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साठेलकर यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाला वाळके मास्तर प्रेमींनी उपस्थित राहावे असेही आव्हान त्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

भारताची चंद्रावर स्वारी यशस्वी!

news

दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनात स्थानिकांना प्राधान्य हवेच! माजी खासदार नीलेश राणे

news

शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते नव तेजस्विनी प्रदर्शनचा शुभारंभ.

news

Leave a Comment