क्राईम

अंधेरी पूर्व परिसरात १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला!

Spread the love

६ ऑगस्ट वार्ता: मुंबई – पुण्यातील दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी पूर्व परिसरात एका १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला झाला आहे. लग्नास नकार दिला, म्हणून संतापलेल्या प्रियकराने हा चाकू हल्ला केला आहे. काल सायंकाळच्या वेळेस तरुणी अंधेरी पूर्वेकडील ब्युटी पार्लर क्लासला जात असतानाच क्लास बाहेर उभे असलेल्या तिच्या २२ वर्षीय प्रियकराने तरुणीवर चाकू हल्ला करून पळ काढला. या प्रकरणी हल्लेखोर तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. उबेद शेख (२२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

अंधेरी पूर्व परिसरात राहणारी सतरा वर्षीय तरुणी आणि पवईच्या चंदनशहा अली दर्गा परिसरात राहणारा बावीस वर्षीय तरुण उबेद यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यांचा विवाह देखील ठरला होता. मात्र, मागील महिनाभरापासून या दोघांमध्ये भांडण होऊ लागले. आपल्या प्रेयसीचे इतर मुलांसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शेख याला आल्याने तो महिनाभरापासून आपल्या प्रेयसीसोबत वाद घालत असे. या वादाला कंटाळून प्रेयसीने शेखसोबत बोलणे बंद केले होते. या दोघांमध्ये वादावादी झाली, याच काळात उबेद नशा पण करत असल्याचे तरुणीला समजताच तिने त्यास लग्नास नकार दिला व त्याचा फोन नंबर ब्लॉक करून पुन्हा संपर्क करू नकोस, असे त्यास खडसावले. मात्र काल सायंकाळी तरुणी अंधेरी पूर्वेकडील ब्युटी पार्लर क्लासेससाठी जात असताना क्लासच्या दरवाजासमोरच दबा धरून उभे असलेल्या शेखने पाठीमागून तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर शेखने तेथून पळ काढला. यासंदर्भात तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात उबेद विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी उबेदला अटक केली आहे.


Spread the love

Related posts

नगर येथे १५ दिवसांत ८ अल्पवयीन मुली बेपत्ता: २ धर्मांधांना अटक!

news

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा! विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर

news

सोशल मीडियावरुन दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, पोलिसांनी…

प्रसाद परब

Leave a Comment