स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ.

Spread the love

६ ऑगस्ट वार्ता: येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ झाला आहे. लवकरच संग्रहालयाच्या अंतर्गत फर्निचरचे काम पूर्ण होऊन संग्रहालय प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.अभिरक्षक प्रवीण शिंदे पुढे म्हणाले की, संग्रहालयातील १६ व्या ते १८ व्या शतकातील पुरातन लाकडी नक्षीदार मेणा, लाकडी देव्हारा, नक्षीदार पालखी, राजघराण्याची छत्री, वाळ्याचे पंखे, तत्कालीन महिलांची पुरातन चोळी आदी वस्तूंचे हवेतील तापमान, आर्द्रता आदींचा परिणाम होऊन त्या जीर्ण होऊन खराब होऊ नयेत, त्यांचे आयुष्य अजून १०० वर्षे टिकून रहावे, यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धन प्रक्रिया चालू आहे.


Spread the love

Related posts

शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्काराने देवयानी आजगावकर सन्मानित….!

news

कळसुलकर हायस्कूलच्या सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर कोरले आपले नाव.

news

शिवसेनेच्‍या आमदार पात्रतेविषयी २० ऑक्‍टोबर या दिवशी सुनावणी होणार !

news

Leave a Comment