स्टोरी

आजगांव मध्ये उद्या श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार आयोजित ‘गुरूवंदना सोहळा’!

Spread the love

सिंधुदुर्ग: संगीत अलंकार सौ. वीणा हेमंत दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग शिष्य परिवाराच्या वतीने ‘गुरूवंदना संगीत सोहळा २०२३’ उद्या शनिवार दि. ०५ ऑगस्ट २०२३ दु. ठिक ३.०० वा श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगांव ता सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी संस्धानचे युवराज श्री लखमराजे भोसले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

गोवा येथील संगीतज्ञ ज्येष्ठ संवादिनी वादक श्री राया कोरगावकर सर, ज्येष्ठ कीर्तनकार गायक प्रा. डॉ. श्रीराम दीक्षित सर, सिंधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भजनरत्न श्री भालचंद्र केळुसकर बुवा तसेच संगीत क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सर्व संगीत प्रेमी मंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्य परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

मनसे पदाधीकाऱ्यांच्या मळगाव पंचक्रोशीत BSNL नेटवर्क सुरळीत…!

news

पळसंब येथे नवरात्रौत्सवा निमित्त विविध स्पर्धा संपन्न!

news

विद्यार्थ्यांचा स्पर्धापरीक्षांमध्ये सहभाग वाढवा!दीपक भोगटे यांचे शिक्षकांना आवाहन!

news

Leave a Comment