स्टोरी

वेंगुर्ले येथे आयशर टेम्पोला आग लागून नुकसान!शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा संशय….

Spread the love

वेंगुर्ले: वेंगुर्ला भटवाडी येथे आडीपूल जवळ मेघा पाटकर यांच्या घरासमोरील जागेत उभा असलेल्या आयशर टेम्पोला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीत टेम्पोचे नुकसान झाले. मात्र स्थानिकांसह वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब यांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एम एच ०७ एजे ३२०२ या आयशर गाडीच्या पुढील भागाला अचानक आग लागली होती. पाटकर कुटुंबीयांना ही आग लक्षात येताच त्यांनी तात्काळ बजूच्याना आणि वेंगुर्ले नगरपरिषदेला कळवले आणि स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यानंतर प्रीतम सावंत तसेच वेंगुर्ला अग्निशमन दलाचे कर्मचारी भाऊ कुबल, गौरव आरेकर, पकंज पाटणकर, उमेश वेंगुर्लेकर, गणेश जाधव, मुकादम बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन बंबाच्या सहाय्याने आग विझवली. यावेळी वेंगुर्ले पोलीस कर्मचारी आणि अणसुर मधील युवकही आग विझविण्यासाठी सहभागी झाले होते.


Spread the love

Related posts

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून ८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान होणार..!

प्रसाद परब

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे २० वे राज्यपाल…. राजभवनात मराठीतून घेतली शपथ….

news

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १६ ते २२ जून २०२३ रोजी होणार!

news

Leave a Comment