शिक्षण

दहावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल!

Spread the love

२८ जुलै वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज शुक्रवार दि.२८ जुलै रोजी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीचा आज शुक्रवारी होणारा पेपर पुढे ढकलला असून हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होत आहे. परंतु सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार होता. परंतु आता हा पेपर ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

फ्लोरेट कॉलेज येथे मोफत फॅशन डिजाईनिंग बॅचचे यशस्वी आयोजन!

news

मालवण दांडी शाळेमध्येमोफत वह्या वाटप कार्यक्रम!

news

मुणगे हायस्कुलचे क्रीडा स्पर्धेत यश ! रिया सावंत विभागीय स्पर्धेसाठी पात्र

news

Leave a Comment