राजकारण

वित्त विभागाकडील फाईल शिंदे-फडणवीस यांच्या देखरेखीखाली असेल; शिंदे गटातील नेत्याचा दावा

Spread the love

१६ जुलै, मुंबई वार्ता : ”अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते भलेही असले, तरी यावेळी मागील सरकारसारखी पुनरावृत्ती होणार नाही. वित्त विभागाकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली असेल. महाविकास आघाडीच्या काळात निधीचा असमतोल होता, गैरसमज होते. अजित पवार यांच्या फाईल्सची केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही छाननी केली जाईल,” असे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्याचे समर्थन केले आहे.

अजित पवार अर्थमंत्री झाल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. त्यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना योग्य प्रमाणात निधी देण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. या सरकारमध्येही असेच काही घडण्याची भीती या आमदारांना असल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी याबाबत हे महत्त्वपूर्ण विधान

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे आमदारांना निधी मिळण्यात अडचणी येत होत्या; मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिवसेनेलाही तेवढाच वाटा मिळणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा विरोध असतानाही राज्याचे अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेले आहे.


Spread the love

Related posts

कसाल-धनगरवाडी मधील ग्रामस्थांनी हाती घेतली मशाल..! आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात केले स्वागत

news

नाराजीनाट्यानंतर बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांची पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद;

news

आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला राम राम ठोकला…..

news

Leave a Comment