शिक्षण

आर.पी. बागवे हायस्कूल मसुरे येथे ६ जुलै रोजी जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि लोकल कमिटी मसुरे आयोजित मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्याने ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून द्यावयाच्या पारितोषिकांचा जिल्हास्तरीय वार्षिक बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दिनांक ६ जुलै रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी गुणवंत विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ,पालक, शिषक,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती अर्चना कोदे, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, प्रभारी मुख्याध्यापक भरतगड हायस्कूल मसुरे देऊळवाडा एस आर कांबळे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

ओझर विद्यामंदिरचा १००% निकाल!

news

स्वराली मुणगेकर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

news

“पदवीधर शिक्षकांना” वेतन देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढावा..!

प्रसाद परब

Leave a Comment