क्राईम

प्रियासीने प्रियकराला बेदम मारहाण करून लाखो रुपयांचे दागिने लुटले!

Spread the love

४ जुलै वार्ता: ३० वर्षीय महिलेने आपल्या चार मित्रांसह स्वतःच्या प्रियकराला बेदम मारहाण करून लाखो रुपयांचे दागिने लुटून नग्नावस्थेत शहापूर महामार्गावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी भाविका भोईर, नदीम खान आणि तीन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालाजी शिवभगत हा शहापूर येथील रहिवासी असून त्याचा बांधकाम व्यवसाय आहे. भाविका भोईर या शहापूर येथील तरुणीशी त्याचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २८ जून रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास भोईर यांनी शिवभगत यांना शहापूर येथील आटगाव महामार्गावरील एका ठिकाणी बोलावले. दोघेही गप्पा मारत असताना भाविका भोईरचे चार साथीदार तिथे आले आणि बालाजीवर प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्रीपर्यंत हे पाचजण त्याला मारहाण करतच होते त्यांनतर दुसर्‍या दिवशी पहाटे त्याचे कपडे काढून नग्नावस्थेतच त्याला शहापूर महामार्गावर फेकून देण्यात आले.

पिडीत व्यक्तीने पोलिसांशी बोलताना सांगितले की “मी तिच्यासाठी सर्व काही केले, तिच्या इच्छेनुसार एक छोटेसे घर बांधले, तिच्यासाठी खरेदी केली. तिने दुसर्‍या माणसासाठी माझा विश्वासघात केला आणि माझ्यावर क्रूरपणे हल्ला केला. भाविकाने साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे पैंजण, बांगड्या, नवीन पावसाळी शूज छत्री सगळं घेऊन आटगाव हायवेवर बोलवलं होतं मी पोहोचताच ती गाडीत (क्रेटा) बसली, गिफ्ट्स घेतले आणि तेव्हा अचानक चार जण, त्यापैकी तीन अज्ञात, कारमध्ये घुसले, त्यांनी मला बाजूला ढकलले आणि माझ्या डोक्यावर चॉपरने हल्ला केला. त्यापैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली.

संशयित आरोपी महिला

शहापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले की, आरोपींनी शिवभगत यांना नंतर एका बंद अनोळखी रेस्टॉरंटमध्ये नेले आणि सकाळपर्यंत मारहाण केली, आरोपीने पीडित व्यक्तीचे कपडे काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ शूट केला शिवाय त्याच्या दोन सोन्याच्या साखळ्या, सात अंगठ्या काढून घेतल्या, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि पहाटे पाचच्या सुमारास पळ काढला. स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित बालाजीने पोलिस स्टेशन गाठले आणि मदतीसाठी त्याच्या मित्रांना बोलावले ज्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.”दरम्यान, पाच आरोपींवर आयपीसी कलम ३६५, ५०६ आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सखोल तपास सुरु आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे लाच लुचपत विभागाच्या ताब्यात..

news

मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणार्‍या आतंकवाद्यांकडे आढळली चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे!

news

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्याे आंबे पिकवणार्यांलवर अन्नन आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई!

news

Leave a Comment