राजकारण

आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्ष उभा करणार! राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

Spread the love

२ जुलै वार्ता: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपसोबत जात राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. अजित पवार यांच्यासोबत जेवढे गेले आहेत त्यातील ८० टक्के आमदार परत येणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे. अनेक आमदार आज संध्याकाळपर्यंत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते जमू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासोबतच आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तो खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटसचा एक भाग होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही. ज्यांनी शपथ घेतली तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही. आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्ष उभा करणार”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.


Spread the love

Related posts

माणगावमधील वीज प्रश्नाची आमदार नाईक यांच्याकडून दखल

news

खडसे यांचे जावई यांनी भोसरी भूखंड हडपल्याच उच्च न्यायालयाच्या निदर्शनात…

news

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता….चंद्रशेखर बावनकुळे

news

Leave a Comment