स्टोरी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धादिन दिना निमित्त कल्याण पूर्वेत वह्यांचे वाटप!

Spread the love

उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे यांचा उपक्रम…..

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – शिवसेना पक्ष फुटी नंतरही असंख्य शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून समाज कार्य करीत आहेत. मुळ शिवसेनेच्या ‘८० टक्के समाज कारण आणि केवक मात्र २० टक्के राजकारण’ या सुत्रानुसार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वेतील उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे यांच्या विद्यमाने विजय नगर परिसरातील विद्यार्थ्यांना तीन हजार वह्यांचे विनामुल्य वाटप करण्यात आले. हिंदू ह्यदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिना निमित्त कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ९८ / ९९ चे विभाग प्रमुख महेंद्र एटमे यांनी स्वखर्चाने विजय नगर परिसरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ३ हजार वह्यांचे विनामुल्य वाटप केले. रविवारी विजय नगर येथे संपन्न झालेल्या या वह्या वाटप कार्यक्रम समयी शहर प्रमुख शरद पाटील, माजी स्थानिक नगरसेविका शीतल मंढारी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील, माजी महापौर रमेश जाधव, महीला शहर संघटक मिना माळवे, युवा सेना शहर अधिकारी नीरज कुमार, उपशहर प्रमुख गंबाजी लाड, उप शहर संघटक मेघनाथ चव्हाण, उपविभाग प्रमुख राजेश पेडणेकर, कृष्णकांत मोरे, राजेंद्र देशविकर, संजय पिंगळे, शाखा प्रमुख प्राण भोसले, अभय देसाई आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समयी माजी नगरसेविका श्रीमती शितल मंढारी, नारायण पाटील आदी पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना संबोधीत केले. विजय नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंती महोत्सव समितीचे सलग ८ वर्षे अध्यक्षपदाची सुत्रे यशस्वीपणे सांभाळणारे आणि एल. आय. सी. कंपनीत सेवेत असतांनाही समाज कार्याची ओढ असलेले महेंद्र एटमे यांच्या या वह्या वाटप उपक्रमाचा लाभ परिसरातील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ऊबाठा सेनेचे आशिष सुभेदार आक्रमक…! प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा.

news

हमास -इस्रायल युद्ध थांबणार?

news

विरार अलीबाग काॅरीडोर संबंधी ५०० च्या आसपास शेतकर्‍यांच्या हरकती.

news

Leave a Comment