स्टोरी

कुडाळमध्ये एका नामांकित हॉटेलात मुंबईतील महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

Spread the love

सिंधुदुर्ग(कुडाळ): कुडाळ मधील एका नामांकित हॉटेलमध्ये मुंबईमध्ये राहत असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला मात्र हा घातपात आहे की अन्य काही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे या प्रकरणात कुडाळ पोलिसांनी तपास सुरू केला असून याबाबतचे अधिक माहिती अशी की कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये 40 वर्षीय मुंबईतील महिला मंगळवारपासून रूम नंबर 208 मध्ये राहत होती तर त्या लगतच रूम नंबर 209 मध्ये जिल्ह्यातील दोन युवक राहत होते त्यातील एक युवक हा कुडाळ तालुक्यातील होता. हे दोन्ही युवक त्या महिलेच्या संपर्कात होते त्यातीलच एका युवकाने त्या महिलेच्या नावे हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.

शुक्रवारी ती महिला रूमचे दार उघडत नसल्याने त्या युवकांनी हॉटेलच्या मॅनेजरला कळवले व त्यानंतर पुढे कुडाळ पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचतात कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील घटनास्थळी दाखल होऊन ही महिला रूमचे दार उघडत नसल्याने लॉक तोडले असता रूममध्ये फॅनला दोरीच्या साह्याने लटकलेला महिलेचा मृतदेह आढळून आला मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला दरम्यान कुडाळ पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला यावेळी मृत महिलेच्या संपर्कात असलेले दोन्ही युवक घटनास्थळी होते. या युवकांनी पोलिसांना संशय वाढवणारी माहिती दिल्याने या घटनेचे गुढ वाढले असून अधिक तपास कुडाळचे पोलीस निरीक्षक श्री शंकर चिंदरकर व त्यांचे सहाय्यक श्री मनोज पाटील हे करत आहेत.


Spread the love

Related posts

।।जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।। १६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव!’

news

प्रजासत्ताक दिनानिमित्त NCC मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस सर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अनंत अभिजीत चिंचकर यांचा गौरव.

newss

कट्टा येथे प्रा.मधु दंडवते यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमानी साजरा!

news

Leave a Comment