क्राईम

जत (तालुका सांगली) तलाठी संघटनेच्‍या अध्‍यक्षांवर दुसर्‍यांदा लाच घेतांना गुन्‍हा नोंद!

Spread the love

१६ जून वार्ता: येथील करजगी येथे बाळासाहेब जगताप हे तलाठी आहेत. तक्रारदाराच्‍या घराचे बांधकाम चालू असून बांधकामासाठी आलेल्‍या वाळूचा अवैध साठा केला आहे, असे सांगून, तसेच अवैध वाळू साठवणूक केली म्‍हणून कारवाई न करण्‍यासाठी तलाठी जगताप यांनी तक्रारदारकडे ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्‍ट केली. पडताळणीनंतर लाचेची मागणी केली असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. तक्रारदाराकडून रहात्‍या घरी ५० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना जगताप यांना रंगेहात पकडले आहे.

या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्‍यात लाचखोर तलाठी बाळासाहेब जगताप यांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. जगताप हे दुसर्‍यांदा लाचलुचपत विभागाच्‍या जाळ्‍यात अडकले आहेत. ७ जुलै २०१४ या दिवशी तक्रारदाराच्‍या खरेदी दस्‍ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्‍यासाठी १० सहस्र रुपयांच्‍या लाचेची रक्‍कम घेतांना त्‍यांना रंगेहात पकडण्‍यात आले होते. त्‍या वेळी मिरज शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा प्रविष्‍ट करण्‍यात आला होता. सध्‍या हे प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे.


Spread the love

Related posts

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येबाबत विशेष अपडेट्स!

news

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना २४ तासांत जेरबंद
ठाणे गुन्हे शाखेची चपळ कारवाई

प्रसाद परब

मुंबई विक्रोळी येथून मुलाला पळवून नेणार व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात…!

news

Leave a Comment