स्टोरी

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनाच्या निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव!

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ जून या दिवशी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी सिन्हा यांच्याकडे श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र अशा दोघांना त्याचा लाभ होईल. श्रीनगरमधील महाराष्ट्र भवन हे केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे रहाणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य, तसेच संस्कृती यांची झलक पहाता येऊ शकेल. जम्मू-काश्मीर समवेतचे नाते अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असे या प्रस्तावाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


Spread the love

Related posts

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

news

जैन समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी..! राज्यमंत्रीपदाचा दर्जा.

news

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द..! श्री लखमराजे भोंसले.

प्रसाद परब

Leave a Comment