स्टोरी

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यविभागाद्वारे भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्यात येणार आहे. ६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री उपस्थित रहाणार आहेत.

याविषयी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. महाराजांचा विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोचवण्याचा दृढ निश्चय राज्यशासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आला आहे.’’


Spread the love

Related posts

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरवर बसवलेल्या ChaSTE पेलोडचा प्रारंभिक डेटा उपलब्ध!

news

सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती आणि येथील भाषा खरंच मला भावली..! धावपटू विल्सन किप्रॉप

प्रसाद परब

खैरतस्करांवर सावंतवाडी वन विभागाच्या फिरते पथक व सावंतवाडी परिक्षेत्र कार्यालयाची संयुक्त कारवाई! सावंतवाडीच्या पुष्पा गॅंगची धरपकड सुरू….

news

Leave a Comment