स्टोरी

सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना मोठा दिलासा; कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात दरमहा संपन्न होणार पेन्शन अदालत!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती वेतन विषयक बाबी लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महापालिकेमार्फत आता दरमहा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात पे‌न्शन अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन संपन्न झाल्यावर सकाळी १०.३० च्या सुमारास पेन्शन अदालत घेतली जाईल. यासाठी विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत आपली पेन्शन विषयक तक्रार, निवेदन अर्ज महापालिका सामान्य प्रशासन विभाग मुख्यालयात पाठविणे आवश्यक राहिल.

ही तक्रार व निवेदन अर्ज वैयक्तिक स्वरुपाची असावीत. पेन्शनधारक/कुंटुंब निवृत्तीधारक यांनी या पेन्शन अदालतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. तथापि आजारपणामुळे, वयोमानानुसार किंवा अपरिहार्य कारणास्तव ते येवू शकत नसतील, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला लेखी स्वरुपात प्राधिकृत करावे आणि प्राधिकृत केलेल्या व्यक्तिने आपणास प्राधिकृत केल्याचे पत्र कार्यालयीन कामाच्या ८ दिवस अगोदर पोहचविणे आवश्यक आहे.

या पेन्शन अदालतीत चौकशीची अथवा न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आश्वासीत सुधारीत योजनेबाबत थकबाकी मिळणेबाबतची प्रकरणे, सहाव्या-सातव्या वेतन आयोगाची थकबाकी बाबतची प्रकरणे, विहीत नमुन्यात नसलेले व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज इ. स्वीकृत केले जाणार नाहीत. या पेन्शन अदालतीमुळे सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी वर्गास एक प्रकारचा मोठा दिलासा प्राप्त होणार आहे.


Spread the love

Related posts

शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आयोजितभव्य शेतकरी – सभासद मेळावा!

news

कोकण रेल्वेमार्गावर ३१ ऑक्टोबरला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव (कुडाळ) येथील निराधार महिलेला मदत.

news

Leave a Comment