राजकारण

संसद भवनाच्या उद्घाटनावर शरद पवरांची प्रतिक्रिया!

Spread the love

२८ मे वार्ता: आज २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नविन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचं आणखी समाधान वाटतंय अशा शब्दात पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं आणखी मला समाधान वाटतंय. त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही कर्मकांड सुरू होतं ते पाहिल्यानंतर अधुनिक भारताची संकल्पना जी जवाहारलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.


Spread the love

Related posts

संतोष बांगर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार?

news

उपमुख्यमंत्र्यांवर बाळासाहेब थोरातांनी साधला निशाणा; काय म्हणाले थोरात..?

news

मसुरे सुपुत्र श्री नंदू ( दादा ) परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती…

news

Leave a Comment