स्टोरी

म्हसळा नगर पंचायतीने स्वच्छता अभियानाचे जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेशाने केलेले यशस्वी आयोजन!

Spread the love

म्हसळा प्रतिनिधी: जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनानुसार म्हसळा नगरपंचायतीने आज सकाळी ८ वाजता शहरांतील एस.टी. स्टँड ते पोलीस स्टेशन या परिसरांत स्वच्छता अभियान राबविले . यावेळी मुख्याधिकारी मनोज विष्णुपंत उकिर्डे,स.पो.नी.संदीपान सोनवणे, म.पो.स.ई. योगिता बांडे, स्वच्छता समिती सभापती सुमैया कासम आमदानी, नगरसेवक संजय कार्णिक, संजय दिवेकर, राष्ट्रवादी काँगेसचे तालुका अध्यक्ष समिर बनकर, कासमशेट आमदानी, शिवसेना (शिंदे गट) प्रविण बनकर, प्रेस  क्लबचे अध्यक्ष बाबू शिर्के  पोलीस विभागातील मींडे, संतोष चव्हाण, सुर्यकांत जाधव, कॉ. कोथींबरे, ग्रामिण रुग्णालयांतील स्टाफ, नर्स प्रेरणा कदम,नगरपंचायतीचे सुरेश जाधव, संतोष कुडेकर, हानीफ भाई, जंगम म्हसळा शहरांतील नागरिक उपस्थित होते.

भविष्यांत नागरिकांच्या सहकार्याने उर्वरीत आभियान राबविणारआसल्याचे स्वच्छता समिती सभापती सुमैया कासम आमदानी यानी सांगितले. भविषयांत अतिक्रमणमुक्त रस्ते अभियाना अर्तगत म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मुख्य रस्ता श्रीवर्धन गोरेगाव रोड, रस्त्यावरील सुमारे ५०० मीटर रस्त्यांवरील पादचाऱ्याना आडचणीची ठरणारी अतिक्रमणे हाटविण्यांत येणार आसल्याचे  सांगण्यांत आले. अस्वच्छतेमुळे पर्यावरणाची गुणवत्ता कमी होऊन नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होतो आणि आरोग्यास हानी पोहचते हेघडू नये म्हणून आज आपण नागरिकांनी सूचविले त्याप्रमाणे ग्रामिण रुग्णालया पासून स्वच्छता अभियान. सुरू करीत आहोत. असे यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यानी सांगितले.


Spread the love

Related posts

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी….! डॉ विश्वास साठे.

news

पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याचे शिवरायांचे होते ध्येय..! अँड शिवाजी देसाई यांचे अँड उदय भेंब्रे यांना प्रत्युत्तर.

news

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथील लाईट पोल वरील लटकता मोठा लोखंडी रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता..! रवी जाधव 

news

Leave a Comment