क्राईम

नगर येथे १५ दिवसांत ८ अल्पवयीन मुली बेपत्ता: २ धर्मांधांना अटक!

Spread the love

१६ मे वार्ता (जिल्हा नगर):– येथे मागील आठवड्यात ६ अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्या. पुन्हा मागील २ दिवसांत २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. मागील १५ दिवसांत एकूण ८ प्रकरणे पुढे आल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा फारूक शेख याला मुलीसह कह्यात घेण्यात आले. दुसर्‍या घटनेत सादिक शेख याने हळद लागलेली नवरीच लग्नाच्या दिवशी पहाटे मंगल कार्यालयातून पळवून नेली होती. त्यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ७ मे या दिवशी १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. दुसर्‍या घटनेत ८ मे या दिवशी १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. दोन्ही घटनेत पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास..! पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल

news

तलाठी भरती परीक्षेच्या तिसऱ्या सत्रामध्ये कॉपी करणारा पोलिसांच्या ताब्यात!

news

ठाणे : अवैध पाण्याच्या कॅन विक्रीचा धंदा उघडकीस; FDA ची धडक कारवाई

प्रसाद परब

Leave a Comment