क्राईम

पनवेल फार्महाऊसवर आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा मोठा छापा; १३ बुकींना अटक

Spread the love

पनवेल: आयपीएल सामन्यांवर अवैधरित्या सट्टा लावणाऱ्या टोळीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पनवेलमधील एका फार्महाऊसवर छापा टाकत पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन आणि इतर माध्यमांतून सट्टेबाजी करत होते. छाप्यादरम्यान सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारे मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अवैध सट्टेबाजीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठे यश मानली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे


Spread the love

Related posts

ई स्टोअर इंडिया प्रकरणाबाबत योग्य तपास व्हावा…! पत्रकार प्रसाद परब यांची मागणी 

news

पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

news

बारावीच्या परीक्षेच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल.

news

Leave a Comment