Uncategorized

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी गुणपत्रक व दाखल्याची गरज नाही..! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

Spread the love

१ जून वार्ता: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी प्रवेश प्रक्रिये अंतर्गत २९ मे २०२६ रोजी पहिली नियमित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, अनेक शाळांमधून अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्देश जारी केले आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि एलसी सादर करण्याची अट तात्पुरती काढून घेण्यात आली आहे. केवळ कागदपत्रे नाहीत म्हणून कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्याला प्रवेश नाकारू शकत नाही. असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता २०२६-२७ अकरावी प्रवेश प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार आहे.हे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

कणकवली येथे “चला बालपण जपूया” या बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रसाद परब

वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने वतीने गोवा टूर्सचे आयोजन

news

नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्रपरिवारासह आदमापूरबाळूमामांच्या चरणी नतमस्तक.चिमगांवचे मेजर रणजीत मुसळे यांच्या वतीने आदमापूर बाळूमामा मंदीरात नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा सत्कार.

प्रसाद परब

Leave a Comment