स्टोरी

तोरणागडाच्या (पुणे) तटबंदीखाली ३ शिवकालीन गुहा सापडल्या!

Spread the love

पुणे: – वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गांकडून बुधला माचीकडे आडबाजूला ३ शिवकालीन गुहा उजेडात आल्या आहेत. गड-दुर्ग प्रेमींसाठी हा कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय असल्याने तोरणागडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. या गडावर तोफेचे गोळे, शिवकालीन नाणी किंवा गुप्त भुयारी मार्ग हे अनेक वेळा सापडले आहेत. या गडाच्या मेटपिलावरे मार्गावरील श्री कुंबळजाई मंदिर मार्गे अडगळीच्या झाडाझुडपांतून पढेर दांडावर जातांना स्थानिक नागरिकांना या गुहा दिसल्या. त्यांनी गुहेच्या तोंडाशी असलेली झुडपे आणि माती काढून पाहिले असता आत प्रशस्त आकाराची गुहा आढळली, अशी माहिती माजी सरपंच हनुमंत पिलावरे यांनी दिली. यातील एका गुहेत बसण्यासाठी दगडी आसन व्यवस्था, मध्यभागी चौक आहे, तर इतर दोन गुहांमध्ये जातांना गुडघ्यावर वाकत जावे लागत आहे. गुहेच्या आतील अंतराचा अंदाज येत नसून आत गेल्यास जीव गुदमरला जात आहे. तरी पर्यटकांनी अतीउत्साहाने गुहेमध्ये जाऊ नये.


Spread the love

Related posts

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

news

बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे सरपंच मा. श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन.

news

मॉरीशसला संपन्न झाले आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन

news

Leave a Comment