राजकारण

तुमच्या सारख्या लोकांवर टीका करायलाही लाज वाटते! देवेंद्र फडणवीस.

Spread the love

मोदी आडनावासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकीही रद्द केली. यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत माफी मागायला मी सावरकर नाही माझे नाव गांधी आहे आणि गांधी कुणाचीही माफी मागत नाहीत. असे म्हटले होते. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते सावरकरांना माफीवीर म्हणतात. अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही मला लाज वाटते. कारण त्यांची तेवढी पात्रता नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाहीत.शरम करा शरम करा, तुमच्या सारख्या लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण तुमची तेवढीही पात्रता नाही, जे स्वातंत्रवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचे नाव सांगता, त्या पक्ष्यातल्या नेत्यांनी इंदिरा गांधींचा गौरव केला, यशवंत राव चव्हानांनी त्यांचा गौरव केला आणि तुम्ही कुठले काल आलेले स्वातंत्रवीर सावरकरांना माफीवीर म्हणता. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरहि टीका केली. फडणवीस म्हणाले की, दुर्दैव एका गोष्टीचं आहे की ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसलेले आहेत. खरे तर, ही एवढी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. पण उद्धव ठाकरे त्यांचा निषेध करू शकले नाहीत. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.


Spread the love

Related posts

अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया…

news

खडसे यांचे जावई यांनी भोसरी भूखंड हडपल्याच उच्च न्यायालयाच्या निदर्शनात…

news

उद्धव ठाकरे सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

news

Leave a Comment