स्टोरी

सिंधुदुर्गमधील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक संवाद!

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला अधिक गती मिळावी, नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आज ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला.या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर, माजी आमदार श्री. राजन तेली, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, MIDC चे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य अभियंता श्री. प्रकाश चव्हाण, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजू परब यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग हा नैसर्गिक साधनसंपत्ती, स्थानिक कौशल्य आणि उद्योजकतेची मोठी क्षमता असलेला जिल्हा आहे. या क्षमतेला योग्य संधी, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीची जोड मिळाल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला अधिक बळ मिळू शकतं.उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य मार्ग काढणं, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करणं आणि जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, या दिशेने प्रयत्नशील राहण्याची भूमिका यावेळी मांडली.


Spread the love

Related posts

उरण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

news

सर्व अधिकार ग्राहकांना माहीत असल्यास ग्राहक सजग बनेल l…! तहसीलदार दिक्षांत देशपांडे

news

कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची धडक…!

news

Leave a Comment