स्टोरी

जामीन मिळवण्यासाठी वकिलांनी गुन्ह्याचा परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक – पालक न्यायमूर्ती अश्विन भोबे

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी : एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी ला जामीन मिळवण्यासाठी वकिलांनी त्या गुन्ह्याचा चिकित्सक आणि परिपूर्ण कायद्याच्या चाकोरीअभ्यास करणे आवश्यक आहे. जामीन कोणत्या प्रकारे मिळू शकतो याचा अभ्यास असणे गरजेचे आहेजामीन मिळवण्याचेप्रकार वेगवेगळे आहेत, असे मत गोवा राज्याचे पालक न्यायमूर्ती अश्विन दामोदर भोबे यांनी व्यक्त केले.सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे ‘लेक्स डिस्कशन या व्याख्यानमालेत आज जामिनाचा कायदा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सत्र न्यायाधीश त्रिपाठी, ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर, तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर आदी उपस्थित होते.यावेळी न्यायमूर्ती श्री भोबे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री त्रिपाठी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत एडवोकेट रणशूर यांनी केले.यावेळी न्यायमूर्ती भोबे पुढे म्हणाले, जामिना मिळवण्याचे प्रकार नेमका काय आहे हे अभ्यासणे गरजेचे आहे. वकिलाच्या हाती एखाद्या गुन्ह्याची फाईल आल्यानंतर त्या गुन्ह्याचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. आरोपीला गुन्हाच्या प्रकारातून सोडवण्यासाठी जामीन प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकार आहेत हे आपल्याला समजणे गरजेचे आहे जामीन मिळवण्यासाठी आधी त्याने केलेल्या गुन्ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्या पद्धतीने जामीन प्राप्त करून घेता येऊ शकतो वकील वर्ग एखाद्या आरोपीला जामीन मिळवण्यासाठी आपल्याला प्रक्रिया माहिती आहेत असे आपण समजतो, पण प्रत्यक्षात त्या त्या गुन्ह्याच्या प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या प्रकारे जामीन मिळवता येतो.

जामीनाचे प्रकार : अटकपूर्व जामीन,

गुन्हा दाखल झाल्यावर किंवा गुन्हा होण्यापूर्वी त्यामध्ये अटक होऊ नयेयासाठी अटकपूर्व जामीन मिळवता येतो

रेग्युलर बेल

नियमित जामीन आरोपीला अटक करून झाल्यानंतर किंवा न्यायालयीन कोठडीत असताना जामीन मिळवता येऊ शकतो आणि जामीन घेता येऊ शकतो

डिफॉल्ट बेल

गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ६० ते ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले नाही तर आपोआप प्राप्त होणारा जामीन.

जादा तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीचा जामीन

एखाद्या आरोपी तुरुंगवास मध्ये आहे आणि त्याला शिक्षेच्या प्रमाणात जास्त कालावधी झाला असेल आणि अद्याप केस संपली नसेल तर अशावेळी त्याला जामीन मागता येतो

बेकायदेशीर अटक झाल्यास जामीन – एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केली गेली असल्यास त्याला जामीन मिळवण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे न्यायालयाकडून जामीन मिळवणे सुलभ आहे, मात्र त्यासाठी वकील वर्गाने त्या कायद्यांचा परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणालेजामीन रद्द करण्याची प्रक्रिया ही आहे हे सांगताना ते म्हणाले एखाद्या आरोपीला जामीन घेताना न्यायालयाने अटी व नियम घातले असतील आणि त्याचे त्यांनी भंग केले असल्यास किंवा चुकीची माहिती न्यायालयाकडे देऊन जामीन मिळवला असल्यास अशा आरोपीचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया ही आहे या सर्व बाबींचा परिपूर्ण कायद्याच्या चाकोरीत राहून अभ्यास करणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने न्यायमूर्ती भोबे यांचा शाल व श्रीफळ देऊन ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला उपाध्यक्ष ॲड. सिद्धी परब यांनी केले तर परिचय ॲड. तृप्ती राऊळ यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.या व्याख्यानाला सुमारे १२० हून अधिक वकील बांधव तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती भोबे यांना कायद्याच्या प्रक्रियेबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली.


Spread the love

Related posts

सावंतवाडी जिमखाना जाधववाडी येथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय

news

माडखोल धवडकी येथे आयोजित वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप.

newss

Leave a Comment