स्टोरी

चराठा वझरवाडी भोसले नॉलेजसिटीकडे जाणाऱ्या खराब रस्त्यामुळे अपघाताचे सत्र सुरूच.

Spread the love

सावंतवाडी: चराठा वजरवाडी भोसले नॉलेजसिटी कडे जाणाऱ्या जाणारा रस्ता रहदारीस अक्षरशा धोकादायक बनला आहे आणि याच रस्त्यावरून नागरिकासह हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. या खराब रस्त्यामुळे वहिनीला दोन ते तीन अपघात होत असतात.आज सकाळीच 9 वाजता त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या माझगाव येथील 26 वर्षीय युवकाचा खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या कारला टक्कर देऊन अपघात झाला. त्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला कवितेतील ग्रामस्थांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले व याची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान दिली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तला मदत केली. रोज या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. काही वेळा कित्येक अपघात घडले त्यावेळी सामाजिक बानी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यांना मदत केली. वारंवार होत असलेल्या अपघातांची कल्पना संबंधितांना वारंवार दिली असताना देखील कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तरी तेथील सरपंच तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी मत व्यक्त केले. सदर रस्त्यावरील धोकादायक खड्डे आठ दिवसात बुजवले गेले नाही तर विद्यार्थी तसेच नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सामाजिक बांधिलकी माध्यमातून सदर रस्त्यावरील धोकादायक खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजवले जातील असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे चौकुळ चिखलव्हाळ बेरडकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप..!

news

१५ ऑगस्ट रोजी मसुरेत माजी सैनिकांचा रूदय सत्कार…

news

४ जून रोजी कोल्हापूरला शेतकऱ्यांचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

news

Leave a Comment