सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे महाविद्यालय स्तरावर एच.आय.व्ही./एड्स जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही./एड्सविषयी शास्त्रीय माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्यविषयक सजगता निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते व समुपदेशक श्री. सुनील सोन्सुकर तसेच सहकारी श्री. अमित लिंगवत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. सुनील सोन्सुकर यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत भुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री. अमित लिंगवत यांचे स्वागत श्री. दिगंबर सारंग सर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना एच.आय.व्ही./एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, योग्य काळजी आणि या आजारासंदर्भातील गैरसमज याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. योग्य माहिती, जनजागृती आणि संवेदनशील दृष्टिकोनातूनच एच.आय.व्ही./एड्सविषयी समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसाद कोलगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत भुरे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेली आरोग्यविषयक माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ .सोनाली बांदेलकर यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक ठरलेल्या या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“योग्य माहिती, सजग विचार आणि प्रतिबंधात्मक कृती—एच.आय.व्ही./एड्समुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल!”
