सावंतवाडी: महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या छतावरील सौर ऊर्जा (Smart Rooftop Solar) योजनेबाबत आज सावंतवाडी वीज कार्यालयात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकाच दिवसात १३६ जणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती वीज वितरणचे उप अभियंता श्री. राक्षे यांनी दिली.सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सावंतवाडी वीज कार्यालयाजवळ या योजनेसाठी खास कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षात वीज ग्राहकांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी बोलताना श्री. राक्षे म्हणाले, “ज्या घरगुती वीज ग्राहकांचा सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या वर्षभराच्या कालावधीत दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर आहे, अशा ग्राहकांना फक्त १० हजार रुपयांत १ किलोवॅटचा रूफटॉप सोलर सिस्टीम मिळणार आहे. यामुळे वीज बिलात बचत, स्वच्छ ऊर्जा, घरगुती स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाची संधी मिळणार आहे असे ते म्हणाले.
बीपीएल ग्राहकांसाठी :केंद्र शासन अनुदान – ३०,००० रु.राज्य शासन अनुदान – १७,५०० रु. एकूण अनुदान – ४७,५०० रु.ग्राहकाचा हिस्सा – फक्त २,५०० रु. एससी / एसटी ग्राहकांसाठी :*केंद्र – ३०,००० रु. + राज्य – १५,००० रु. = एकूण ४५,००० रु. अनुदानग्राहकाचा हिस्सा – ५,००० रु.
सर्वसाधारण / ओबीसी ग्राहकांसाठी :केंद्र – ३०,००० रु. + राज्य – १०,००० रु. = एकूण ४०,००० रु. अनुदानग्राहकाचा हिस्सा – १०,००० रु.या योजनेमुळे वीज बिलाचा भार कमी होतो, सौरऊर्जेमुळे स्वयंपूर्णता वाढते, शिल्लक वीज विकून अतिरिक्त उत्पन्न मिळते, पर्यावरणपूरक स्वच्छ ऊर्जा वापरला जातो आणि स्थानिक रोजगार व हरित विकासाला चालना मिळते.आजच्या शिबिरात १३६ जणांनी अर्ज केले असून २ जणांनी प्रत्यक्ष पैसे भरून नोंदणी पूर्ण केली आहे. जास्तीत जास्त सावंतवाडीकर वीज ग्राहकांनी या स्मार्ट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राक्षे यांनी केले आहे.
