स्टोरी

श्री. किशोर अरविंद वालावलकर यांना नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाचा “गुरुसेवा पुरस्कार” जाहिर.

Spread the love

सावंतवाडी (प्रा. भरत गावडे): नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी या संस्थेच्या वतीने गेली १३ वर्ष प्राथमिक, माध्यमिक व विशेष कार्य करणाऱ्या गुणवंत व उपक्रमातील शिक्षकांना गुरु सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२६ चे मानकरी वसंत शेठ केसरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार श्री. किशोर अरविंद वालावलकर( कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त) यांना देण्यात आला आहे .रोख रुपये ५००० ,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप आहे. हा पुरस्कार जिल्हास्तरीय आहे पुढील पुरस्कार असे रुपेश दत्ताराम परब .जि प . शाळा . इन्सुली नंबर चार सावंतवाडी .एकनाथ धोंगडे रवळनाथ विद्यालय ओटवणे ता सावंतवाडी दोडामार्ग अरुण वसंत पवार जि .प. शाळा कोलझर, सौ. पूर्व संदीप गवस शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, कुडाळ तालुका श्रीमती अरुणा घाटकर . जि . प. शाळा नेरूर शिरसोद, श्री सलीम तकीलदार साळगाव हायस्कूल साळगाव,कणकवली तालुका, संतोष लक्ष्‍मण तांबे ,शाळा माईंड युनिट नंबर एक श्री मुकेश बाळकृष्ण पवार माध्यमिक विद्यालय शिवडाव माध्यमिक विद्याल

मालवण तालुका अमर अशोक वाघमारे . जि . प .शाळा घुमडे सौ . मधुरा माणगावकर न्यू इंग्लिश स्कूल आचरा, देवगड तालुका वर्षाराणी सतीश कुमार कर्ले, जि .प शाळा मीठ मुंबई पौर्णिमा पुरुषोत्तम केरकर अनंत कृष्णा केळकर वाडा हायस्कूल. वैभववाडी तालुका सुरेंद्र सुधीर साळुंखे .जि .प. शाळा विद्या मंदिर सोनाळी नंबर १, आनंद बाबुराव जाधव माध्यमिक विद्यालय करूळ बावडा .वेंगुर्ला तालुका, सौ. मनाली मंगेश कांबळे जि. प. शाळा आसोली सौ. मीनाक्षी अशोक काळे वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला, त्याचप्रमाणे विशेष सन्मानही दिले जातात. यावर्षी रणजीत सावंत जि . प. शाळा नंबर २, सावंतवाडी श्री .रमेश लक्ष्मण शिंदे, जि प. शाळा नंबर १, सौ ज्योती दीपक परब जि .प .शाळा सांगेली नंबर १, स्वाती सचिन देसाई जि. प . शाळा कोनशी, श्री संजय मधुकर शेवाळे, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली . सौ .रिया रामनाथ सांगेलकर जि. प. शाळा शिरशिंगे नंबर १, संजना संतोष गावडे (अंगणवाडी) मराठी बेरडची चौकूळ, निवड समिती म .ल.देसाई, सौ .संजीवनी फडके, भरत गावडे, अजय सावंत, विठ्ठल कदम यांना हे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह ,शाल श्रीफळ, ग्रंथ भेट असे आहे .पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल. सर्वांचे अभिनंदन विद्यमान आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच दीपक केसरकर मित्र मंडळ सदस्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे .


Spread the love

Related posts

‘एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे.! कोमसापचा ऐतिहासिक उपक्रम.

newss

माडखोल देऊळवाडी – खळणेवाडी सांगेली मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य.

news

भानुदास चिंदरकर यांचे निधन!

news

Leave a Comment