स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंकुर निवारा केंद्रामध्ये “व्यावसायिक दृष्ट्या सक्षम महिला” विविध व्यावसायिक प्रशिक्षण सुरू.

Spread the love

सावंतवाडी: समाज सेवा तसेच आरोग्य सेवे बरोबरच आता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने “व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला” हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे याच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाची सुरुवात सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात झाली आहे. हतबल व निराधार महिलांसाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून विनामूल्य विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यातून रोजगार निर्मिती करता येईल यासाठी ही संस्था काम करणार आहे यासाठी संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी पुढाकार घेतले आहे तसेच या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी संस्थेच्या सचिव समीरा खलील,शरदिनी बागवे हेलन निबरे, लक्ष्मण कदम व रवी जाधव हे देखील सदस्य सहकार्य करत आहेत. यामध्ये मेहंदी प्रशिक्षक साझिया पडवेकर यांच्यामार्फत मेंदीचा कोर्स तसेच विविध वस्तू बनवणे अशा अनेक प्रशिक्षणासहित रोजगार निर्मितीसाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे या प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य संस्थेमार्फत विनामूल्य पुरवण्यात आले आहे. हे प्रशिक्षण आठ ते दहा दिवस सुरू राहणार आहे. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करणारे येथील श्री.बापू शिंगारे महिला व बालविकास अधिकारी,श्री सिकंदर आढाव, कनिष्ठ लिपिक श्रीमती ऐश्वर्या कल्याणी, अधिपरिचारिका श्रीमती वेदिका सावंत स्वयंपाकी , श्री तुलसीदास तावडे कनिष्ठ काळजी वाहक, श्री जोशना रेडकर सुरक्षा रक्षक,श्री ज्योती पालव सुरक्षा रक्षक व निकिता कदम केअरटेकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

प्रसाद परब

तिरोडा नं.१ शाळेत आरती संग्रह प्रकाशित.

news

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनविसेनेच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…! केतन सावंत.

news

Leave a Comment