सावंतवाडी प्रतिनिधी: शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेचे दैनंदिन व मासिक अहवालाचे काम अधिक सुलभ, पारदर्शक आणि बिनचूक व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या विशेष ‘स्मार्ट एक्सेल शीट’ (SMART EXCEL SHEET) चे यशस्वी प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सभागृहात आयोजित शिक्षण सभेदरम्यान दाखवण्यात आले. जि. प. प्राथ. शाळा न्हावेली नं. ३ (ता. सावंतवाडी) चे उपक्रमशील शिक्षक श्री. सुदर्शन केशव बोराडे यांनी हे उपयुक्त एक्सेल शीट विकसित केले आहे. जि. परिषद अध्यक्षांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण सभेस मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोदजी कामात, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, शिक्षण सभापती आदरणीय श्री. प्रितेशजी राऊळ, बांधकाम सभापती आदरणीय श्री. संतोष साटेलकर, शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. सुबोध माने यांसह उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री. सुदर्शन बोराडे यांनी ‘स्मार्ट एक्सेल शीट’च्या प्रत्यक्ष वापराचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर केले. रोजच्या किचकट आणि वेळखाऊ गणनेपासून (Calculations) शिक्षकांची सुटका करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.मा. अध्यक्ष व सभापतींकडून कौतुकमा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोदजी कामत, शिक्षण सभापती श्री. प्रितेशजी राऊळ, बांधकाम सभापती मा. श्री. संतोषजी साटेलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आ. श्री. रविंद्रजी खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी श्री. सुबोध माने यांनी श्री. बोराडे यांच्या कल्पकतेचे व तंत्रस्नेही प्रयत्नांचे कौतुक केले. पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेचे कामकाज या SHEET मुळे अत्यंत सोपे, जलद व पद्धतशीर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांचा मौल्यवान वेळ वाचवून शालेय पोषण आहाराच्या नोंदींमध्ये सुसूत्रता आणणाऱ्या या ‘स्मार्ट एक्सेल शीट’चा वापर जिल्ह्यातील सर्व शाळांनी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य*सदर उपक्रम व ‘स्मार्ट एक्सेल शीट’ निर्मितीच्या प्रवासात: मा. केंद्रप्रमुख आ. श्री. म. ल. देसाई (विशेष सहकार्य व मार्गदर्शन) श्री. विजय गावडे, श्री. रुपेश परब, श्री. संतोष रावण, श्री. महेश पालव सर या सर्वांचे महत्त्वपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभले. श्री. सुदर्शन बोराडे यांच्या या तंत्रस्नेही उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
