क्राईम

ठाणे : अवैध पाण्याच्या कॅन विक्रीचा धंदा उघडकीस; FDA ची धडक कारवाई

Spread the love

ठाणे | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : ठाणे पश्चिमेतील ओवळा नाका येथील ब्लू रूफ क्लबजवळ अवैधरित्या पाण्याचे कॅन विक्री केल्याचा गंभीर प्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीज यांच्या तक्रारीनुसार उघडकीस आला. खाद्य व औषध प्रशासन (FDA) अधिकारी राजू अक्रुपे यांच्या नेतृत्वात झालेल्या छाप्यात सदर जागा सील करण्यात आली. चौकशीत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथून दररोज ७०० ते ८०० बीस लीटरच्या कॅन विकल्या जात होत्या.याच १०० मीटर परिसरात आणखी दोन ठिकाणी असेच अवैध धंदे चालवल्याचे समोर आले असून, विकी ठाकूर आणि संजय पाटील यांच्यावरही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. कासारवडवली पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.सुरक्षित पाणी हक्काचा प्रश्न! नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे १९ खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर

news

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना २४ तासांत जेरबंद
ठाणे गुन्हे शाखेची चपळ कारवाई

प्रसाद परब

पुण्‍यातील बुधवार पेठेतून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !

news

Leave a Comment