शिक्षण

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आर्यन झोरे आणि कु आराध्या बाबू झोरे या भावंडांनी पटकावले राष्ट्रीय यादीत स्थान

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: कुणकेरी शाळा नं. २ च्या इयत्ता दुसरीतील कु आर्यन बाबू झोरे आणि इयत्ता चौथीतील कु आराध्या बाबू झोरे या दोन भावंडांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अनुक्रमे ९ वा आणि २१ वा क्रमांक पटकाविला. कु आर्यन झोरे याने या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ९ वा क्रमांक मिळवताना या स्पर्धेत पहिल्या १५ विद्यार्थ्यांच्या विशेष राष्ट्रीय यादीत स्थान पटकावले.

इयत्ता चौथीतील कु आराध्या झोरे हिने यशवंत स्पर्धा परीक्षेत १८० गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावताना गोल्ड मेडल पटकावत अव्वल स्थान प्राप्त केले. तसेच आराध्या झोरे हिने सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत १६८ गुणांसह गोड मेडल व ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ७९ गुणांसह ब्राँझ मेडल पटकाविले.इयत्ता दुसरीतील कु आर्यन बाबू झोरे याने सिंधू रत्न टॅलेंट परीक्षेत १७३ गुणांसह गोल्ड मेडल व ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ८९ गुणांसह ब्राँझ मेडल प्राप्त केले. इयत्ता तिसरीतील कु सौम्या रामदास झोरे हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ५१ गुणांसहउल्लेखनीय यश प्राप्त केले. तसेच मंथन जनरल नॉलेज परीक्षेत आर्यन झोरे याने १५० पैकी १३० गुण घेत राज्यात अकरावा तर जिल्ह्यात सहावा क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, माजी सभापती प्रमोद सावंत, केंद्रप्रमुख भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे, भगवान सावंत, एकनाथ सावंत, नाना गावडे, कैलास परब, रघुनाथ गावडे, तानाजी सावंत, कृष्णा गावडे, महादेव गावडे आदींनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

बारावीच्या परीक्षेच्या निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

news

एस.पी.के महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा.

news

८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी “पर्सनल डेव्हलपमेंट” कॅम्पचे आयोजन..!

news

Leave a Comment