स्टोरी

एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे साजरा होणार श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी (दीपक पटेकर): सावंतवाडी: सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. १२ शके १९४८, मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी खालीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.सकाळी ८.०० वा.श्री एकमुखी दत्त पूजा, लघुरुद्र, अभिषेक, ९.०० वा. श्री सत्यदत्त पूजा, दु.१२.३० श्रींची महाआरती, दु. १.३० वा.महाप्रसाद, सायं.४.०० वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ७.३० श्रींची आरती, ८.०० वा. श्रींचा पालखी सोहळा, ९.०० वा. स्थानिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.


Spread the love

Related posts

क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या दि. १५ ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार! शीतल राऊळ

news

जलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम..!

news

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तूंचे वितरण.

newss

Leave a Comment