स्टोरी

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची पहिली जिल्हा बैठक संपन्न; संघटना बांधणी आणि पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीचा निर्धार

Spread the love

सावंतवाडी: ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर संघटनेची पहिली अधिकृत सभा आज सावंतवाडी येथील ‘पर्णकुटी’ शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील पत्रकारितेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला.सभेच्या सुरुवातीला नूतन जिल्हा कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यानंतर संघटनेच्या आगामी कार्यप्रणालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि विशेषत ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटनेशी जोडून घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर म्हणाले की, पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया‘ नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यालय जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर, उत्तर सिंधुदुर्ग अध्यक्ष विष्णू धावडे, दक्षिण सिंधुदुर्ग अध्यक्ष भूषण सावंत, कार्याध्यक्ष मिलिंद धुरी व भूषण देसाई, जिल्हा सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष जय भोसले, सुयोग पंडित, राजा दळवी, जनसंपर्क व प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक वासुदेव उर्फ नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत, तसेच सदस्य रणजीत जाधव आणि यश माधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उत्तर सिंधुदुर्ग अध्यक्ष विष्णू धावडे यांनी मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमुळे जिल्ह्यात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या कार्याला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.


Spread the love

Related posts

मंदिरांच्या प्रथा-परंपरा अखंडित ठेवण्यासाठी मंदिरांवर सरकारऐवजी भक्तांचेच नियंत्रण हवे ! मंदिर विश्वस्त

news

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार

news

कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

news

Leave a Comment