ओरस प्रतिनिधी: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांची देयके व प्रलंबित प्रश्न यांचा निपटारा न झाल्यामुळे व वारंवार पत्रव्यवहार करूनही शिक्षकांचे प्रश्न न सुटल्यामुळे प्राथमिक शिक्षक असोशियेशन असोसिएशन असोसिएशनच्या वतीने दिनांक ६ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग नगरीच्या प्रवेशद्वारावर निवृत्त प्राचीन प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केलेले होते. या आंदोलनास जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रमोद कामात, उपाध्यक्ष दादा साईल व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ व इतर लेखाधिकारी श्री पाटील सर, मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब, शिक्षणाधिकारी परब साहेब यांनी भेट देऊन प्रशासनाच्या वतीने आपले प्रश्न मिटवण्यासाठी बैठक घेण्यात आली. .या बैठकीमध्ये १९३७ ते १९८६ पर्यंत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी सेवाजेष्ठ शिक्षकांना २० टक्के लोकांना दिले मात्र ८० टक्के लोक १९८७ पासून शिल्लक आहेत. त्यांना लाभ कधी देणार? असा प्रश्न विचारला. त्यावेळी याचे शिक्षकांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे. त्यांना तो लाभ देण्याचा संदर्भात परिणाम पंधरा दिवसात निर्णय घेतला जाईल. असे अध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार एक वेतन वाढ जि.प. फंडातून देता येणार नाही. असे सांगितले. आजपर्यंतच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सुमारे अडीच कोटी रक्कम लागणार आहे. ती आपण जि.प.च्या फंडातून देऊ शकत नाही. पालकमंत्र्यांच्या वतीने शासनाकडून ही मागणी करून ती पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. बढती मिळालेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ मिळालेली नाही. अशा शिक्षकांना शिक्षकांची यादी आमच्याकडे द्या संबंधित शिक्षकांना वेतन वाढ देण्यात येईल. रजा रोखी करण करण्याचा विषय १९८१ मधील ५४ (१ व २ )अन्वये प्राथमिक शिक्षकास त्यांच्या दीर्घकालीन सुट्टीत शासकीय कामात गुंतवल्याने त्याची हक्काची सुट्टी त्याला भवता आली नाही. त्याच्या दहास सहा या प्रमाणात १६९ शिक्षकांना अजून मिळालेले नाही. ती पूर्तता करण्यात येईल. असे शिक्षणाधिकारी परब साहेबांनी सांगितलं.

गटविम्याची रक्कम १५३ प्रस्ताव वित्त विभागात आहेत. ती मागणी तात्काळ पूर्ण करण्यात येईल. प्राथमिक शिक्षकांना संगणक सक्तीच्या कक्षेत येत नाही. वेतन कापून घेऊ नये. असा शासन आदेश असतानाही सहा लोकांची जी कपात केलेली आहे ती तात्काळ देण्यात यावी. अशी विनंती करण्यात आली. रेकॉर्ड पाहून त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वेतन वाढ मिळाले नाही. ते काम प्रगतीपथावर आहे. एका शिक्षकाला वेतन वाढ दिलेले आहे. त्यानुसार अन्य शिक्षकांना वेतन वाढ दिली जाईल. असे सांगण्यात आले. उत्कृष्ट अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन वाढीचा विषय सहाव्या वेतन आयोगामध्ये बंद करण्यात आलेला आहे.

निवृत्तीवेतना जीवनमान म्हटले आहे ते नियमित एक तारीख ला देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. असे सांगण्यात आले. या चर्चेच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षानी पुन्हा सेवानिवृत्त शिक्षकांना प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.असे आश्वासन दिले. माहितीच्या अधिकारात माहिती दिली असता चुकीची माहिती देणाऱ्या पाच तालुक्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल.अ से मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब यांनी सांगितले .

