शिक्षण

वेर्ले गावची कन्या कुमारी वेदा राऊळ सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रथम.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकूनही मराठी भाषा अवगत होण्यासाठी सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सलग दोन वेळा इसरो विमान सफरीसाठी निवड झालेली सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी व मूळ वेर्ले गावची कन्या कुमारी वेदा राऊळ हिची गतवर्षी पण सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये इयत्ता ६ वी टाॅप फाईव्ह मध्ये निवड झाली होती व तिला इसरो विमान सफरीसाठी संधी मिळाली होती. यावर्षी तिने इयत्ता ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आईवडिलांचे व शाळेचे नावलौकिक वाढवलेले आहे. सलग दोन वर्ष इंग्रजी माध्यमाच्या या विद्यार्थिनीने सिंधुरत्न टॅलेंट परीक्षेत घवघवीत यश मिळवले. इसरो विमानाची दुसरी सफर ठरणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे: तिच्या यशामागे तिचे आईवडील म्हणजे जि. प. शाळा निरवडे नं. १ मध्ये कार्यरत उप शिक्षिका सौ. प्रज्ञा प्रविण राऊळ व ग्रा. पा. पु. पंचायत समिती सावंतवाडी येथे कार्यरत वरिष्ठ सहाय्यक श्री. प्रविण राऊळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वेर्ले हा तिचा मूळ गाव असून सावंतवाडीतील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

तर ग्रामीण भागातील शाळा कायमस्वरूपी बंद पडतील..! माजी सभापती उदय परब

news

जि.प. पूर्ण प्राथ शाळा न्हावेली नं. १ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

news

हुशार मुलानी राजकारणात वळावे..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

news

Leave a Comment