सावंतवाडी प्रतिनिधी: या सत्काराने मी भारावून गेलो आहे हा माझा घरचा सन्मान आहे. माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक राजकीय वाटचालीत सारस्वत समाज बांधवांचे प्रेम आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलेत. त्यामुळे हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. अशा शब्दात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्पष्ट केले. गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी तालुका यांच्या सहकार्याने सावंतवाडी येथील मांगीरीश बँक्वेट वेट हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष वासुदेव झाट्ये, सरस्वत बँक संचालक श्री सुनील सौदागर, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, सावंतवाडी तालुका मधील शैलेश पै, प्रज्ञा प्रमोद कामत, जिल्हा कार्यकारणी सेक्रेटरी वैभव केकरे, सावंतवाडी मधील व्यावसायिक काशिनाथ दुभाषी, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश पाई, सावंतवाडी नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, सावंतवाडी समिती मधील सचिव गुरुदत्त जी कामत, प्रसाद महाले, संतोष कुलकर्णी, विशाल पै, कळसुलकर इंग्लिश स्कूल शिक्षक सिद्धेश कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, जतिन कुलकर्णी, डॉ क्षमा देशपांडे, आजगाव सरपंच यश श्री सौदागर, श्याम पंडित, सचिन मांजरेकर, अवधूत कळसुलकर, मनोज कुलकर्णी, अमोल प्रभू झांट्ये, संजय पुनाळेकर, प्रशांत कामत, भूषण कुलकर्णी, नरेंद्र देशपांडे, कुंदा पै, नितेश पिंगे, राहुल शेणई, सोनू रांगणेकर, गौरांग चिटणीस, अविनाश पै, विनायक रांगणेकर, आशुतोष भांगले, नितेश पिंगे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री कामात यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू सरस्वती देवीची मूर्ती देऊन भाई मंत्री व सुनील सौदागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती प्रज्ञा प्रमोद कामत यांचाही समाजातील पाच सुवासिनीने ओवाळून ओटी भरून सत्कार केला. सत्काराला उत्तरे येताना ते पुढे म्हणाले १९८७ मध्ये आपण राजकारणात सुरुवात केली. मी गावात युवा क्रीडा मंडळ सुरू केले. त्यानंतर गावचा सरपंच म्हणून काम केले. जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंतचा हा माझा प्रवास गौड सारस्वत ब्राह्मण समाज बांधवांच्या प्रेमाने आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच जिल्ह्यातील इतर समाज बांधवांचे प्रेम माझ्या पाठीशी आहेच. खरं तर या माझ्या राजकीय जडणघडणीत राणे कुटुंबीय आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन मला मिळत आहे आणि त्यामुळेच मी राजकीय जीवनात यशस्वी होऊ शकलो. माझी बिनविरोध निवड झाली. हे सर्व समाज घटकातील लोकांचे प्रेमाने आशीर्वादामुळेच समाजाचे हित जपणे समाजातील तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे. मी ते पूर्ण करणार आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे भव्य दिव्य भवन कुडाळ येथे होत आहे. त्या भावनाला माझ्याकडून भरीव मदत मी करेन. असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख पाहुणे समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाई मंत्री यांनी आजच्या राजकारणात प्रामाणिक माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. अशावेळी गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रामाणिकपणे आतापर्यंत वागत आले. स्वभाव गुण चांगले अशी व्यक्ती जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विराजमान होते. हे आपल्या समाजाचे मोठे भाग्य आहे. त्यांच्या हातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भरीव असा विकास होवो. हीच सदिच्छा. यावेळी सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची निवड झाली. ही खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात गौड सारस्वत समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. एक दिवस ते या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील एवढी क्षमता आणि ताकद त्यांच्या अंगी आहे. त्या दृष्टीने त्यांनी आतापासूनच काम करावे.अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव झट्ये यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांची निवड झाली. ते प्रामाणिक आणि त्यांच्या अंगी नेतृत्व गुण आहेत. त्याचे हे फळ आहे. ते नेहमी समाज हितासाठी त्यांचे नेहमी योगदान असते सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीला धावणारे असे त्यांचे कार्य आहे. शब्दात त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविक शैलेश पै म्हणाले, गौड सारस्वत समाज आज सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर आज नव्या तंत्रज्ञान युगातही वेगवेगळ्या पद्धतीने झेप घेत आहे. अशा स्थितीत तरुण पिढी आज एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी झटत आहे आणि या माध्यमातून आज एक आपल्या समाजातील हरहुन्नरी आणि प्रेमळ नेतृत्व प्रमोद कामत यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे खरंतर भाग्याचाक्षण म्हणावा लागेल त्यांच्या माध्यमातून समाजाचे हित होईल.
