Uncategorized

भारत पाक भारत चीन युद्धात इसराइल युद्धातील विजय योद्धा विठ्ठल सावंत यांचा जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सन्मान गौरव..!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भारत-पाक युद्ध भारत चीन युद्ध इजराइल युद्ध अशा युद्धात शत्रूशी दोन हात करून आपले उत्तम रित्या ९० वर्षाचा आयुष्य जगणारे असे सैनिकी मराठा इन्फंट्री बटालियनचे विठ्ठल बाबाजी सावंत यांचा सत्कार करताना खरंच मी एका देश सेवकाच्या सानिध्यात मला राहता आले. हेच माझे भाग्य आहे. यांच्यामुळेच आम्ही आज सुखी समाधानी आहोत. या लोकांनी जर आपले आयुष्य देश सेवेसाठी अर्पिले नसते तर आम्ही आज गावात सुखी समाधानी राहू शकलो नसतो. त्यामुळे अशा सैनिकाना त्यांच्या पायाचे तीर्थ घेताना खऱ्या अर्थाने मी एका देवाला स्मरण झालो आहे. मी माझ्या आईला देव मानतो त्यानंतर मी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या चरणाला मी नतमस्तक झालो. त्यानंतर मला या ९० वर्षाच्या सैनिकाच्या चरणाला स्पर्श करताना माझे मन भारावून गेले. त्यामुळे मी देश सेवा करणाऱ्या सैनिकात दैवत पाहतो. अशा शब्दात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी गौरव उद्गार काढले. जिल्हा ग्रंथालय व कोकण मराठी साहित्य परिषद च्या वतीने देश सेवा करणाऱ्या सैनिकाचा सन्मान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रत्येक तालुका निहाय शासनमान्य ग्रंथालयांना भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील दशक्रोशी सैनिकी परंपरेचा गाव म्हणून ओळखली जाते. अशा या गावातील एका ९० वर्षीय भारत चीन इसराइल युद्धात सहभाग दर्शवलेले सैनिक विठ्ठल सावंत यांचा जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्या निवासस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालकाने सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या एकंदरीत युद्ध परिस्थितीची जीवन कहाणी समजून घेतली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा संचालक ॲड संतोष सावंत, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे उपाध्यक्ष रमेश सावंत आधी उपस्थित होते यावेळी. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यात ग्रंथालय भेटी कार्यक्रम गेले दोन दिवस सुरू आहे. आतापर्यंत मालवण देवगड कणकवली या तालुक्यातील ग्रंथालयांना भेटी देण्यात आले आहेत. या भेटीच्या कार्यक्रमात सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरा असलेल्या गावातील सैनिकांच्या भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला.

सध्या अमेरिका इराक इराण युद्ध सुरू आहे अशा स्थितीत आपल्या भागातील देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आपण गौरव सन्मान करणे हे आपल्या कर्तव्य आहे. यानुसार वयाची ९० वर्षे पूर्ण केलेले आणि सैनिकी सेवेत भारत चीन तसेच इसराइल युद्धात सहभाग घेतलेले असेशूर योद्धे पराक्रमी देशा सेवक विठ्ठल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शूर योद्धे सैनिक विठ्ठल सावंत यांनी आपल्या ९० वर्षाचा जीवन प्रवास किती खडतर होता आणि आपण सैन्य सेवेत आपल्याला मिळालेली युद्ध मेडल ही खरी आपल्या सेवेतील कमाई आहे. आम्ही देश सेवा निस्वार्थीपणे केली. आज वयाच्या ९० वर्षात खूप काही शिकता आले. भारत तसेच अन्य विदेशात युद्धाच्या निमित्ताने जाता आले. संपूर्ण देश भ्रमंती करता आली. यासारखे भाग्य नाही. देश सेवा हीच खरी आपल्या जीवनाला सार्थकी लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करायला हवे. ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. आज अमेरिका इराक इराण युद्ध ज्या पद्धतीने सुरू आहे. ते पाहता केल्या ४० वर्षांपूर्वी आम्ही इसराइल युद्धात सहभागी झालं होतं.त्या आठवणी आजही जागे आहेत. आज युद्धाची परिस्थिती बदलली आहे युद्धाची झळ सर्वसामान्य जनतेलाही बसत आहे. पण त्या काळात युद्ध हे थेट होते. त्यामुळे आजचे युद्धाने त्या काळातील युद्ध यामध्ये जमीन आसमानचा फरकआहे. मी जो काही आहे तो माझ्या अंगी असलेली देशसेवा हीच मला जगण्याची ऊर्जा देत आहे. असे त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले, खरंतर देशसेवा करणाऱ्या एका वीर योद्धा ला आज मला त्यांच्या चरण स्पर्श करता आले. मी खरंच भाग्यवान आहे आज समाजात अशी माणसे दुर्मिळ आहेत. खरंतर ही दैव देणगी आहे. आज बदलत्या युगात ९० वर्षापर्यंतचा प्रवास सुखकारक करणे म्हणजे दैवी देणगीच आहे आणि हे भाग्य देश सेवा करणारे शूर योद्धे विठ्ठल सावंत यांनी आपल्या संघर्षातून जी देशसेवा घडवली ती खरोखरच वाकण्याजोगी आहे. आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे. मी माझ्या आईला चरण स्पर्श केला. पण एकही राजकीय नेत्याला किंवा अन्य कुणाला मी चरणस्पर्श केला नाही. फक्त मी माझे साहित्यिक गुरु पद्मश्री मधु मंगेश कर्णिक त्यानंतर मी या शूर योध्यांना चरण स्पर्श केला आहे. हा चरण स्पर्श करताना माझ्या मी आईला स्मरण गेलो याचा मला भास झाला. आम्ही साहित्य ग्रंथ चळवळीत काम करताना अशा देश सेवा करणाऱ्या व्यक्तींचा आमच्या हातून सन्मान झाला. हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी जे काही सोसले. त्यांचे कुटुंबीय या सन्मानाला योग्यतेचे आहेत. कारण त्यांच्या सहकार्यामुळेच.शूर योद्धा म्हणून आज हे उत्तमरीत्या जीवन प्रवास घडवत आहेत. त्यांना ना कुठलाही आरोग्याचा त्रास सुदृढ आरोग्य आणि संपन्न आयुष्य जगणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाला खरंच त्यांचे आदर्श घेण्यासारखे आहे. असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड संतोष सावंत यांनी जिल्हा ग्रंथालय संघाने हा केलेला सन्मान खरंच एका देशसेवकाचा केलेला सन्मान गौरव आहे. विठ्ठल सावंत यांनी सैन्य दलात पंधरा वर्षे मराठी लाईफ इन्फंट्री बटालियनमध्ये बेळगाव इथून सुरुवात केली. त्यानंतर त्याने सेकंड मराठा इन्फंट्री लाईट बटालियन मध्ये काम केले. देशसेवा करताना २९७१ चे भारत पाक १९७२ चे भारत चीन युद्ध अशा युद्धात त्यांना एक शूर योद्धा म्हणून सन्मान झाला आहे. तसेच इसराइल युद्धातही त्यांनी सहभाग घेतला आहे. तब्बल दीड वर्ष इसराइल मध्ये युद्धजनपरिस्थितीत त्यांनी आपला देश सोडून कुटुंब सोडून कठीण परिस्थितीत संघर्षमय असा हा काळ होता. असं सर्व संघर्षमय असा जीवनपट अनुभवलेले आणि सैन्य दलातून पंधरा वर्षाची सेवा बजावल्यानंतर कुडाळ येथील वायमन गार्डन मध्ये वीस वर्षे सेवा बजावली त्यानंतर कृषी पशुसंवर्धन आणि आध्यात्मिक अशा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. वाचन आणि भाषा कौशल्याची आणि संवाद साधण्याची त्यांची आवड खरोखरच वाखाण्याजोगी आहे. सुदृढ निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. असे ते म्हणाले.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे कलंबिस्त वसुली अधिकारी सिद्धेश सावंत, वैष्णव सावंत, कुणकेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्मिता शेट्ये, जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा सावंत, काव्य सावंत, अध्यात्मिक वसा घेतलेल्या रुक्मिणी सावंत, संदीप सावंत, साधना सावंत, तेजश्री सावंत आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब विचारणार -सीताराम गावडे

news

शिवसेना दैनंदिनी २०२४ चे ‘मातोश्री’ येथे प्रकाशन!

news

अंध मुलांच्या सहलीचे सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीकडून स्वागत…

news

Leave a Comment