स्टोरी

इन्सुली बिलेवाडी येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी (इन्सुली): सुप्रसिद्ध नेत्रसेवा संस्था Lawrence & Mayo यांच्या सहकार्याने इन्सुली बिलेवाडी यंगस्टार मित्र मंडळ आणि कोठावळे बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.बिलेवाडी येथील श्री. गजेंद्र कोठावळे यांच्या निवासस्थानी आयोजित या शिबिरात सुमारे ८० ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टर आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नागरिकांची तपासणी केली. अनेकांना दृष्टीदोष आढळून आला असून त्यांना माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.या शिबिरामुळे गावातील नागरिकांना तपासणीसाठी बांदा किंवा सावंतवाडी येथे जाण्याचा त्रास व खर्च वाचला.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला. त्यामुळे हे शिबिर सामान्य ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक ठरले.कार्यक्रमाच्या शेवटी Lawrence & Mayo कंपनीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा यंगस्टार मित्र मंडळ आणि कोठावळे बंधू यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांनी भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.इन्सुली बिलेवाडीमध्ये पार पडलेले हे मोफत नेत्र तपासणी शिबिर सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेचा उत्तम आदर्श ठरले.


Spread the love

Related posts

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ खुली निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

news

मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने १४ मार्च रोजी कुडाळ येथे खोट्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणाबाबत विशेष बैठकीचे आयोजन.

news

ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेल गळती.

news

Leave a Comment