Uncategorized

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी आज सर्व स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली

Spread the love

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी आज सर्व स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली आहे. बंद लिफाफ्यात दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे आणण्यात आली होती. रितू तावडे यांनी सर्वपक्षीय स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली. यावर्षी मुंबई महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त आहे. भाजपच्या वाट्याला ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ आणि काँग्रेसला १ स्वीकृत नगरसेवकपद मिळालं आहे. या चारही पक्षांकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रत्येक पक्षाकडून कुणाकुणाला संधी दिली जाईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर याबाबतची अधिकृत नावे आता खुद्द महापौर रितू तावडे यांच्याकडूनच जाहीर करण्यात आली आहे.

भाजपकडून ४ जणांना संधी देण्यात आली आहे. यात प्रतीक करपे, प्रवीण छेडा, नितेश सिंग कमलाकर दळवी हे स्वीकृत नगरसेवक असतील. तर शिंदेसेनेकडून राज सुर्वे, उमेश माने नाव आहे. ठाकरेसेनेकडून माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे, कैलास पाठक हे नगरसेवक आहेत. तसंच काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी हे स्वीकृत नगरसेवक असतील.


Spread the love

Related posts

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

news

खेड्याचा विकास म्हणजे राष्ट्रविकास! श्रीकांत विठ्ठल सावंत,अध्यक्ष मानवता विकास परिषद….

news

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा ! – पंतप्रधान मोदी

news

Leave a Comment