नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्रपरिवारासह आदमापूरबाळूमामांच्या चरणी नतमस्तक.चिमगांवचे मेजर रणजीत मुसळे यांच्या वतीने आदमापूर बाळूमामा मंदीरात नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा सत्कार.आदमापूर | प्रतिनिधी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी कोकण दौऱ्याहून परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुर येथील संत श्री बाळूमामा मंदिरास मित्रपरिवार सह भेट देऊन संत श्री बाळूमामांचे मनोभावे दर्शन घेऊन बाळूमामाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी बोलताना महेश इंगळे मित्र परिवारातील अक्कलकोटचे उद्योगपती नंदकुमार कटारे यांनी सन्माननीय महेश मालक इंगळे यांच्या भक्ती कुंचल्यातून लाभलेला हा कोकण दौरा निसर्गाच्या सानिध्यासह अत्यंत भक्तीमय वातावरणात व्यतीत होत आहे. अध्यात्माचा भाव, भक्तीभाव आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीतून होत असलेला आनंदमयी प्रवास पुढील काही महिन्याकरिता आम्हा सर्व मित्र परिवार करीता मानसिक दृष्टया चार्जेबल ठरणार आहे, असे सांगून महेश मालक इंगळे यांचे आभार मानावे व करावे तितके कौतुक कमीच आहे असे मनोगत व्यक्त करून सर्व मित्र मित्रपरिवारांसह या दौऱ्यातून लाभलेल्या आनंदाप्रित्यर्थ सर्व मित्रपरिवार सदस्यांच्या वतीने महेश मालक इंगळे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महेश मालक इंगळे यांच्या मित्र परिवारातील सदस्य व दहिटणेचे रहिवासी तथा भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त मेजर अमोल माने यांचे सैन्य दलातील सहकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगावचे रहिवासी मेजर रणजीत मुसळे यांच्या वतीने संत श्री बाळूमामांच्य मंदिरात सन्माननीय महेश मालक इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा शाल श्रीफळ, गुच्छ, पुष्पहार देवून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, चिमगांवचे मेजर रणजित मुसळे, अरविंद एकल, साईनाथ एकल, साहिल चौगले, मारुती बुवा, अनिल सडोलकर, शिवशरण अचलेर, नंदकुमार कटारे रामलिंगया स्वामी, बाबा सुरवसे, श्रीशैल गवंडी, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, विश्वनाथ देवरमनी, रवी कदम, कुमार हत्तुरे, सुरेश वाले सर, अंकूश केत, सुनील पवार, संदीप पंडित, मनोज जगताप, कणबसे शेठ, शिव बिडवे, स्वप्निल गायकवाड, रमेश शिंदे सर, राजाभाऊ इंगळे, बंटी नारायणकर, शेखर आडवीतोटे, रजत गायकवाड,महेश मस्कले, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह महेश मालक इंगळे मित्र परिवारातील सदस्य व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
