स्टोरी

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक!

Spread the love

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे माझे वडील अनिल जयसिंघानी यांना सोडवा अशी मागणी केली. त्यासाठी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. ही अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. एवढंच नाही तर अनिक्षाने व्हिडीओ आणि फोटो दाखवून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी विधासभेत दिली होती. या प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज B20 शिखर परिषद 2023  ला संबोधित करणार!

news

उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप ! राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची चेतावणी !

news

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे भरधाव बोलेरो गाडीला भीषण अपघात.

प्रसाद परब

Leave a Comment