स्टोरी

गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज दुपारी १२:३०  च्या दरम्यान गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर जीर्ण वृक्षाची भली मोठी फांदी पडली. त्याच रस्त्यावरून जाताना दोन मोटर सायकल स्वार बाल बाल बचावले. हा वृक्ष रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आहे परंतु अद्यापही त्याच्याकडे कुणाचे हि लक्ष गेला नाही आणि आज त्या जीर्ण झालेल्या वृक्षाची भली मोठी फांदी रस्त्यावर पडली आणि मोठा अपघात टळला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधवने रस्त्यावरील सर्व फांद्या उचलून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.

परंतु जीर्ण झालेल्या वृक्षाचा धोका अजूनही टळला नाही तरी संबंधित जीर्ण झालेल्या वृक्ष मालक यांनी सदर जीर्ण झालेला वृक्ष तातडीने तोडून घ्यावा व पुढे होणारा अनर्थ टाळावा. अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते नव तेजस्विनी प्रदर्शनचा शुभारंभ.

news

आय.जी. संजय दराडे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद! 

news

मसुरे दत्तमंदिर येथे २४ रोजी धार्मिक कार्यक्रम…!

news

Leave a Comment