क्राईम

मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने!

Spread the love

मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजप कार्यकर्ता बिभिषण वारे यांना मारहाण करण्यात आली आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप बिभिषण वारे यांनी केला आहे. बिभिषण वारे यांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. तर नवनाथ नवाडकर यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सूर्वे यांचा बॅनर काढून नवाडकार यांच्या पक्ष प्रवेशाचे बॅनर लावल्यावरून हा वाद झाला अशी माहिती मिळते. या वादातूनच ही मारहाण झाल्याचे समजते. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या नातेवाइकांची हत्या करणारा राशिद पोलीस चकमकीत ठार !

news

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ!धमकीचे पत्र

news

लाच घेणारा तलाठी रंगेहात ताब्यात..! अँटी करप्शन ब्युरो सिधुदुर्ग पथकाची मसुरे येथे कारवाई.

news

Leave a Comment