स्टोरी

विनोद सुके यांचा देवगड येथे सत्कार…! माजी मंत्री भाई गिरकर यांच्या वतीने सन्मान.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवगड तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद विजयानंद सुके यांना महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय भाईसाहेब गिरकर यांनी त्यांचा सत्कार गिर्ये गावाचे माजी सरपंच रुपेश गिरकर यांच्या मार्फत केला. यावेळी श्री. दिलीप गिरकर, सचिन गिरकर, पराग घाटये आणि सुके कुटुंब उपस्थित होते. त्यावेळी श्री. विनोद सुके यांनी सत्कारास उत्तर देताना म्हणाले की भाई गिरकर साहेब आपले आभार मानायला माझ्या जवळ शब्दच नाहीत. लाख लाख धन्यवाद देतो. माझ्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना तुम्ही भरभरून प्रेम देता. हा प्रेरणादायी क्षण मी मनापासून लोकांना सांगत आहे. मला तुम्हच्या विषयी बोलायला शब्द अपुरे पडत आहेत. गिरकर साहेब प्रत्येक वेळी सर्वांचा योग्य तो मानसन्मान राखतात हे अतिशय प्रेरणादायी आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आवळेगांव देव नारायणाचा जत्रोत्सव रविवार २ नोव्हेंबर रोजी.

news

कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योग पडताहेत बंद…!

news

गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात .

news

Leave a Comment