स्टोरी

झारापमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा संपन्न.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस – ओरोस येथील कृषीकन्यांच्या पुढाकाराने झाराप येथील केंद्र शाळा क्र. १ येथे रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य प्राध्यापक भेंडे सर, प्राध्यापक गोपाळ गायकी, प्राध्यापिका भावना पाताडे, प्राध्यापक महेश परुळेकर व प्राध्यापक प्रसाद ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या प्रेरणेतून प्रतीक्षा पाटील, साक्षी ठाकूर, अनस्वरा के. उदय, रिफाना फातिमा आणि शिवरंजिनी आर. या कृषीकन्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रभावी संचालन केले.

 

कार्यक्रमात टाकळा, आळूची पानं, कडवीचिंच, करडई, माठ यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. त्याच रानभाज्यांचा वापर करून विविध चविष्ट व पौष्टिक पारंपरिक पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमात केंद्र शाळा क्र. १ चे श्री शिरोडकर सर, अमोल तेली, सरपंच सौ. दक्षता मेस्त्री, तसेच कृषी सहाय्यक सौ. जागृती शेट्ये उपस्थित होते. ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत रानभाज्यांविषयी माहिती घेतली व कृषीकन्यांचे कौतुक केले. रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी उपयोग व स्थानिक अन्नसंस्कृती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालुक्यामध्ये अढळला कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण…!

news

दशावतार कलाकार प्रकाश लब्दे याचा आंगणेवाडीत सन्मान…!

news

वि. स. खांडेकर विद्यालयात सीड बॉल व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

news

Leave a Comment