स्टोरी

वेंगुर्ला येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

वेंगुर्ला प्रतिनिधी: सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने साई मंगल कार्यालय, एस. टी स्टॅंड जवळ, सुंदर भाटले,  वेंगुर्ले येथे आज महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वा. ते दुपारी १२ वा. या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. यावेळी २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जीवनविद्या मिशन वेंगुर्लाचे माजी खजिनदार लक्ष्मण कुडपकर, मुंबईचे नामधारक गणेश पालकर, जीवनविद्या मिशन वेंगुर्लाचे माजी अध्यक्ष रवींद्र मोचेमाडकर आणि इतर नामधारक व पदाधिकारी उपस्थित होते.
nnisanbet.com

कार्यक्रमाचे उदघाट्न आधार फाउंडेशनचे  संचालक ऍड. श्री नंदन वेंगुर्लेकर, आधार फाउंडेशनचे खजिनदार डॉ. वंदन वेंगुर्लेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. श्री नंदन वेंगुर्लेकर यांनी जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने समाजउपयोगी कार्यक्रम होतच असतात आणि जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्ला यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रक्तदान करतांना नामधारक.

उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ. ऐश्वर्या, सौ. रेडकर, सौ बागेवाडी सिस्टर, अनिल खाडे, शेख आणि डॉ. निलेश अटक यांच्या अनमोल सहकार्याने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने उभादांडा येथे लवकरच आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित करणार असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले. शिबिराच्या शेवटी जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने सर्वांसाठी विश्वप्रार्थना करण्यात आली.


Spread the love

Related posts

म्हसळयांत शिवजयंती उत्साहांत झाली साजरी : बहुतांश राजकीय पक्ष रयतेच्या राज्याचे झेंडया खाली आले एकत्र.

news

सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव २०२३ उत्साहात संपन्न!

news

निवतिबंदर येथील महाविष्णु मंदिराचा 24 पासून वर्धापन दिन सोहळा!

प्रसाद परब

Leave a Comment