शिक्षण

मसुरे गावचे सुपुत्र विक्रम अनिरुद्ध मेहेंदळेचे नीट परीक्षेत यश.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गावाचा रहिवासी विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे याने एमबीबीएस प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ५५० गुण मिळवत देशात १२०८९ रैंक प्राप्त केला आहे. त्याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मधून पूर्ण केले. त्या नंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर येथे प्रवेश घेतला होता. कठोर परिश्रम व सातत्य पूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने नीट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून मसुरे गावाचे तसेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव उंचावले आहे. त्याच्या परिश्रमाला यश मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्र परिवार, संस्थाचालक, शिक्षक व मसुरेवासीयांकडून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रम हा मसुरे येथील प्रतीतयश डॉक्टर सुधीर मेहंदळे यांचा नातू आणि डॉक्टर अनिरुद्ध मेहंदळे, डॉक्टर विणा मेहंदळे यांचा सुपुत्र आहे.
turboslot
विक्रम याच्या यशाबद्दल उद्योजक डॉक्टर दीपक परब, कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्ष अध्यक्ष नंदू परब, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश परब, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळा गोसावी, उद्योजक दीपक सावंत, शाळा कमिटीचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश बागवे, विलास मेस्त्री, मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, जगदीश चव्हाण,मसुरे ग्रामस्थ, भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे नंबर १ चा बांधावरची शाळा स्तुत्य उपक्रम…!

news

वरद वाळकेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड!

news

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी निर्मित आकाश कंदील, उटणे,पणत्या यांचे भव्य प्रदर्शन.

news

Leave a Comment