क्राईम

दोन पुरुषांशी अनैतिक संबंध असल्यामुळे वादविवाद होऊन महिलेचा खून.

Spread the love

आंध्रप्रदेश: अंद्रप्रदेशातील बापटला येथील वेतापलेम मंडल येथील रमणपेटा येथील महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली. एक महिन्यानंतर महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दोन पुरुषांशी अनैतिक संबंध असल्यामुळे वादविवाद होऊन महिलेचा खून झाल्याची माहिती मिळत आहे. महिलेची हत्या दोन लोकांनी नियोजन करून केली आणि तिचा मृतदेह गाढण्यात आला होता. महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तिला दोन मुले आहेत. २४ वर्षीय प्रमिला ही महिनाभरापूर्वी बेपत्ता झाली होती. बेपत्ता महिलेची हत्या दोन आरोपींनी नियोजन करून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मृत प्रमिला ही रमणपेटा पंचायतीच्या विनायकपुरमची रहिवासी होती.

काही महिन्यांनपूर्वी काळात तिचे ईगा वेंकटेश्वर राव नावाच्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. ईगा वेंकटेश्वर राव  निजामपट्टणमचा रहिवासी आहे. पण गेल्या काही काळापासून ती रमणपेटा येथे राहत होते. हे प्रेमप्रकरण सुरु असतांनाच मृत महिलेचे बॉयफ्रेंडच्या भावोजीशी प्रेमप्रकरण सुरु झालं. मृत महिलेचा प्रियकर ईगा वेंकटेश्वर रावने त्याच्या बहिणीचे लग्न त्याचा जवळचा मित्र साईकुम नागाबाबूशी केले होते. पण प्रमिलाचे त्याच्या भावोजीशी म्हणजे नागाबाबूशीही प्रेमसंबंध जुळवले. महिलेने नागाबाबूंला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. पण त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत ईगा वेंकटेश्वर राव आणि साईकुम नागाबाबू यांनी मिळून प्रमिला हिला संपवण्याचा कट रचला आणि नियोजनानुसार प्रमिला हिची हत्या केली.

 

प्रमिलाच्या पतचे निधन झाले आहे. पतीच्या मृत्यूनंतर प्रमिला हिला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या व्यसनाधीन असलेल्या प्रमिला हिला दोघेही पंडिलापल्ली-थिमसमुद्रम रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे त्यांनी तिला दारू पाजली आणि तिच्या डोक्यावर बिअरच्या बाटली मारली व त्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी महिलेचा मृतदेह तिथेच पुरला. काही दिवसांपूर्वी ती काही दिवसांत परत येईल असे सांगून घराबाहेर पडली होती, परंतु बरेच दिवस प्रमिला परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस तपास सुरु होता.


Spread the love

Related posts

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

news

शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नागपूर बुटीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल!

news

इस्लामी शाळा : मदरसा कि आतंकवादी केंद्र?डॉ. रिंकू वढेरा

news

Leave a Comment